Homeकला - क्रीडा१३ वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी व सिद्धी कर्वे विजेते

१३ वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी व सिद्धी कर्वे विजेते

• वेदांत बांगड व हर्षदा सूर्यवंशी पाटील उपविजेते
कोल्हापूर :
चेस असोसिएशन कोल्हापूर आयोजित जी. एच. रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा तेरा वर्षाखालील मुला-मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये विवान सोनी व सिद्धी कर्वे विजेते तर वेदांत बांगड व हर्षदा सूर्यवंशी पाटील उपविजेते ठरले.
स्पर्धेत अंतिम सहाव्या फेरीनंतर मुलांच्या गटात अग्रमानांकित इचलकरंजीचा विवान सोनी सहा पैकी सहा गुण मिळवून विजेता ठरला. नववा मानांकित इचलकरंजीचा वेदांत बांगड पाच गुण व २३ टायब्रेक गुण मिळवून उपविजेता ठरला तर द्वितीय मानांकित कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकरला पाच गुण व २० टायब्रेक गुणासह तृतीय स्थानावर राहिला.
मुलींच्या गटात अंतिम सहाव्या फेरीनंतर द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वेने पाच गुण व साडेएकोणवीस टायब्रेक गुण मिळवून विजेतेपद पटकाविले. सहावी मानांकित कोल्हापूरची हर्षदा सूर्यवंशी पाटीलने पाच गुण व १९ टायब्रेक गुणासह उपविजेतेपद मिळविले. तृतीय मानांकित सांची बजाज साडेचार गुणासह तृतीय स्थानी राहिली.
बक्षीस समारंभ प्रमोद सोनी, आशिष बजाज, वर्षा ठक्कर व वृषाली सूर्यवंशी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भरत चौगुले, मनिष मारुलकर व सचिन वणीरे उपस्थित होते.
दरम्यान, सोलापूर येथे ५ ते ७ जून या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य १३ वर्षाखालील निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. त्यामध्ये मुलांमध्ये विवान सोनी इचलकरंजी, वेदांत बांगड इचलकरंजी, अर्णव पोर्लेकर कोल्हापूर तर मुलींमध्ये सिद्धी कर्वे जयसिंगपूर व हर्षदा सूर्यवंशी पाटील कोल्हापूर यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
32 ° C
32 °
32 °
66 %
4.6kmh
40 %
Thu
32 °
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °

Most Popular

You cannot copy content of this page