Homeइतरस्व. श्रीमंत विश्वासराव घोरपडे यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखरच्यावतीने अभिवादन

स्व. श्रीमंत विश्वासराव घोरपडे यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखरच्यावतीने अभिवादन

कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी, स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक ॲड. प्रमोद वसंत पाटील यांनी व स्व. दलितमित्र दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित संचालक, इतर मान्यवर व उपस्थितांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, इंद्रजीत पाटील, बसगोंडा पाटील, दरगू माने गावडे, सुरेश कांबळे, महेंद्र बागे, कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील आदींसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. तसेच दत्त ऊस वहातूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर, महादेव कुलकर्णी, रावसाहेब गळदगे तसेच दत्त भांडार, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, कामगार सोसायटी यांचे पदाधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
81 %
8.7kmh
85 %
Sat
28 °
Sun
29 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page