Homeइतरविविध प्रकल्पांचा अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी घेतला आढावा

विविध प्रकल्पांचा अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी घेतला आढावा

कोल्हापूर :
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी गुरुवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित बैठकीत शहरातील प्रलंबित प्रकल्प, विकासकामे व आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली.
बैठकीपूर्वी महापौर सौ. रुपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास व इंद्रजित बोंद्रे यांनी डॉ. के. एच. गोविंदराज यांचे शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, छत्रपती ताराराणी व छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिकृती तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा केली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना व काँग्रेसच्या वतीने विविध विषयांवरील निवेदने यावेळी देण्यात आली.
प्रशासकीय बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती सादर केली. अमृत १ व २ योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अंबाबाई विकास आराखडा, शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत, केशवराव भोसले नाट्यगृह तसेच शाहू मिल परिसरातील छत्रपती शाहू महाराज स्मारक आदी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती त्यांनी मांडली. यावेळी शासनस्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव, निधी व अनुदानाबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. नवीन महापालिका इमारतीसाठी आवश्यक निधी, एल.बी.च्या ७ ते ८ कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी आयुक्तांनी केली. तसेच महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली मंजूर झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. विविध प्रकल्पांपोटी सुमारे १३८ कोटी रुपयांचा निधी येणे बाकी असल्याची माहितीही त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page