कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने दि. २४ ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जळगाव येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर व्हॉलीबॉल स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूरची खेळाडू स्वरांजली राजू पाटील हिची कोल्हापूर विभागाच्या संघात निवड झाली आहे.
जळगांव येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत स्वरांजली राजू पाटील ही खेळाडू कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्वरांजली पाटील हिला आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक अजित पाटील,क्रीडा मार्गदर्शक अनिकेत बोडके, शिवाजी पाटील,क्रीडा शिक्षक संदीप पाटील, गौरव खामकर, रोहन शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक उदय आतकिरे, क्रीडा विभाग प्रमुख प्रदीप साळोखे यांचे प्रोत्साहन मिळाले.
स्वरांजली पाटील हिची राज्यस्तरीय सब ज्युनिअर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31
°
C
31
°
29.9
°
66 %
3.1kmh
12 %
Wed
30
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

