Homeसण - उत्सवदिवाळी पाडव्यानिमित्त सजवलेल्या म्हैशींचा रोड-शो

दिवाळी पाडव्यानिमित्त सजवलेल्या म्हैशींचा रोड-शो

कोल्हापूर :
दिवाळी पाडव्यानिमित्त म्हैशींना खास सजवून व सुशोभित करण्यात आले. या सजवलेल्या म्हैशींचा रोड-शो कोल्हापूरात उत्साहात पार पडला. याठिकाणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी यामाहा गाडीवरून म्हैस पळवण्याचा थरार अनुभवला.
बळीराजाला आणि गवळी समाज बांधव तसेच म्हैस धारकांना साथ देणाऱ्या म्हैशीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच जनावर म्हणजे फक्त उपयोगी प्राणी नाही, त्या सामाजिक जीवनाचा भाग आहेत म्हणून दिवाळी पाडव्यानिमित्त त्यांना साज-शृंगार केला जातो. दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त सजवलेल्या म्हशींचा रोड-शो आयोजित करण्यात येतो.
याहीवर्षी या उपक्रमानिमित्त पंचगंगा नदी येथे सजवलेल्या म्हैशींचा रोड-शो झाला. याठिकाणी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट दिली. त्यांनी गवळी समाज बांधव आणि म्हैस धारकांच्या आनंद उत्सवात सहभाग घेतला. तसेच याप्रसंगी यामाहा गाडीवरून म्हैस पळवण्याचा थरार अनुभवला. यावेळी उपस्थित गवळीसमाज बांधव आणि नागरिकांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
53 %
2.6kmh
52 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page