Homeकला - क्रीडाशिवनेरी क्रिकेट क्लबने दिनकरराव यादव ट्राॅफी पटकावली

शिवनेरी क्रिकेट क्लबने दिनकरराव यादव ट्राॅफी पटकावली

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजीत व यादव बंधु (शिरोळ) पुरस्कृत माजी आमदार स्व. दिनकरराव यादव चषक (अ गट) क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले. शिवनेरी क्रिकेट क्लबने कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी संघावर विजय मिळवत ट्राॅफी पटकावली.
राजाराम काॅलेज मैदान येथे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व यादव बंधु (शिरोळ) पुरस्कृत माजी आमदार स्व. दिनकरराव यादव चषक (अ गट) क्रिकेट स्पर्धेतील (तीन दिवशीय) मागील हंगामातील आजचा अंतिम सामना कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी अ विरूध्द शिवनेरी किकेट क्लब यांचेमध्ये खेळविण्यात आला. या सामन्यात शिवनेरी किकेट क्लबने ६ विकेटनी विजय मिळविला. कै आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी अ ने पहिल्या डावात ५२.३ षटकांत सर्वबाद १७८ धावा केल्या. यामध्ये अभिनंदन गायकवाड ६०, श्रेयस चव्हाण ३९, रवी चौधरी १७ व अथर्व शेळके १५ धावा केल्या. शिवनेरी किकेट क्लबकडुन ओमकार मोहितेने ४ प्रथमेश बाजारी व सौरभ कोटलगी यांनी प्रत्येकी २, रोहित पाटील व साईप्रसाद माने यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
उत्तरादाखल खेळताना शिवनेरी किकेट क्लबने पहिल्या डाव ६०.४ षटकांत  सर्वबाद २६४ धावा केल्या. यामध्ये विवेक पाटील ९०, वैभव पाटील ५२, ओमकार मोहिते नाबाद ३४, रोहित पाटील ३३, प्रथमेश बाजारी २२, आदित्य पाटील १५ धावा केल्या. कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमीकडुन श्रेयश चव्हाण व भरत पुरोहित यांनी प्रत्येकी ३ वरद माळीने २ व शुभम मानेने १ बळी घेतला.
कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी अ ने दुसऱ्या डावात ३१.५ षटकांत सर्वबाद १७३ धावा केल्या. यामध्ये भरत पुरोहित ७१, महेश मस्के २४, श्रेयश चव्हाण नाबाद २२, शुभम माने २० व सुदर्शन कुंभार १३ धावा केल्या. शिवनेरी किकेट क्लब कडुन रोहित पाटीलने ४, ओमकार मोहितेने ३, प्रथमेश बाजारी व आदित्य पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
उत्तरादाखल खेळताना शिवनेरी किकेट क्लबने दुसऱ्या डावात १७.२ षटकांत  ४ बाद ८९ धावा केल्या. यामध्ये आदित्य पाटील नाबाद ४३, वैभव पाटील २५ धावा केल्या. कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी अ कडुन श्रेयश चव्हाण व भरत पुरोहित यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. अशा प्रकारे शिवनेरी किकेट क्लबने ६ विकेटनी विजय मिळवत माजी आम स्व. दिनकरराव यादव अ गट ट्राॅफी पटकावली.
स्पर्धेचा बक्षिस समारंभ एमसीए रणजी संघ निवड समितीचे सदस्य व माजी रणजी खेळाडू संग्राम अतितकर यांच्या हस्ते झाला. यावेळी उपाध्यक्ष अभिजीत भोसले, सचिव मदन शेळके, स्पर्धा कमिटी अध्यक्ष कॄष्णात धोत्रे, रमेश हजारे, मुद्दस्सर मुल्ला, पंच ज्योती काटकर व खेळाडू उपस्थितीत होते.
विजयी संघ : रोहीत पाटील (कर्णधार), ओमकार मोहिते, वैभव पाटील, आदित्य पाटील, विवेक पाटील, प्रथमेश बाजारी, आदर्श माळी, सौरभ कोटलगी, साईप्रसाद माने, प्रेम पाटील, प्रथमेश हेंगाणा, तुषार पाटील, अभिषेक निषाद, अनिकेत नलवडे. संघ व्यवस्थापक प्रसाद उगवे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
50 %
2.1kmh
0 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page