Homeसामाजिक'जितो ॲपेक्स'तर्फे पूरग्रस्तांसाठी दोन कोटींची मदत

‘जितो ॲपेक्स’तर्फे पूरग्रस्तांसाठी दोन कोटींची मदत

पृथ्वीराज कोठारी व ललित गांधी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द
कोल्हापूर :
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) ने राज्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपयांचे भरीव योगदान दिले. जितो अपेक्सचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी आणि जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.
यावेळी जितोचे माजी अध्यक्ष सुखराज नहार, मनोज मेहता, बिपिन भाई दोशी, संजय डांगी, संदीप भंडारी, ॲड. मेघ गांधी, विकास अच्छा आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जितोच्या या उदार योगदानाबद्दल आभार व्यक्त करत म्हणाले की, राज्यात किंवा देशात कोणत्याही प्रकारच्या आपत्तीच्या काळात समाजहितासाठी तत्परतेने पुढे येणारी जितो ही संस्था केवळ व्यावसायिक संघटना नसून एक सामाजिक चळवळ आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेले हे योगदान प्रेरणादायी आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
50 %
2.1kmh
0 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page