कोल्हापूर :
अश्विन शुद्ध तृतीया तिथीला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘महाविद्या श्रीतारा (तारिणी) माता’ रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवात देवीच्या सालंकृत पूजा बांधल्या जातात. बुधवारी तिसऱ्या दिवशी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘महाविद्या श्रीतारा (तारिणी) माता’ रुपातील पूजा श्रीपुजक रामप्रसाद ठाणेकर, सचिन ठाणेकर, अमित देशपांडे व निखिल शानभाग यांनी बांधली.
‘महाविद्या श्रीतारा (तारिणी) माता’ या पूजेचे आधार लेखन वे. सुहास जोशी गुरुजी यांनी केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे. पूजेचे स्वरूप असे – श्रीतारा मातेचा डावा पाय शवावर असून, ही भयानक हास्य करीत आहे. हिच्या चार हातात खड्ग, नीलकमळ, कात्री व खप्पर आहे. हिचा जटालाप पिंगट छटेचा असून तो नागयुगुलांनी युक्त आहे. मुंडमाला धारण करणारी, सर्व जडत्व, नैराश्य, दारिद्र्य खप्परात खेचणारी ही दिव्य देवता आहे. ही दशमहाविद्यांपैकी द्वितीय देवता असून, कालीकुलातील पूर्वाम्नायपीठ देवता आहे. चैत्रशुद्ध नवमीला हिची उत्त्पती झाली. हिचा भैरव अक्षोभ्यरुद्र आहे.
मेरूपर्वताच्या पश्चिमेस चोलना नदीकाठी ही देवी प्रगट झाली. वसिष्ठांनी हिची विशेष उपासना सिद्धी केली. स्पर्शतारा, चिंतामणीतारा, सिद्धिजटा, उग्रतारा, हंसतारा, निर्वाणतारा, महानीला इत्यादी अनेक हिची रूपे व उपासना भेद आहेत.
श्री अंबाबाईची दशमहाविद्यांपैकी ‘श्री तारा माता’ रुपात पूजा
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
26.9
°
57 %
3.6kmh
0 %
Sun
28
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

