कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी च्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात महा रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. या धर्तीवर भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने शहरातील नऊ मंडलांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.२२) सेवा रुग्णालय कसबा बावडा, राधाकृष्ण मंदिर शाहूपुरी, महादेवराव जाधव वाचनालय टाकाळा, शिवाजी तरुण मंडळ शिवाजी पेठ, दैवज्ञ बोर्डिंग मंगळवार पेठ, नेहरूनगर सोसायटी हॉल, खोलखंडोबा मंदिर परिसर हॉल येथे रक्तदान शिबिरे संपन्न झाली. या रक्तदान शिबिरांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात झालेल्या सर्व ठिकाणच्या रक्तदान शिबिरांमध्ये ५०० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रक्तदान शिबिरांना भेटी दिल्या. याप्रसंगी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिर यशस्वी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष धीरज पाटील, सचिन कुलकर्णी, विशाल शिराळकर, राजगणेश पोळ, रविकिरण गवळी, प्रीतम यादव, विनय खोपडे, कोमल देसाई, सुनील पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून विराज चिखलीकर, आप्पा लाड, डॉक्टर राजवर्धन, रवींद्र पवार, नरेंद्र पाटील, नचिकेत भुरके, राहुल लायकर, जयराजसिंह निंबाळकर यांनी काम पाहिले.
याप्रसंगी राहूल चिकोडे, अशोक देसाई, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, रूपाराणी निकम, गिरीश साळोखे, विजय अग्रवाल, गणेश देसाई, माधुरी नकाते, धनश्री तोडकर, सचिन पवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाच्यावतीने शहरातील नऊ मंडलांमध्ये रक्तदान शिबीर
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

