भारतातील बँकांमधून कर्ज काढून देशातून पळ काढणारा विजय मल्ल्या (Vijay Mallya) गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. कारण त्याचा रॉयल चॅलेंजर्स या संघाने आयपीएलच्या ट्रॉफीवर पहिल्यांदा नाव कोरलंय. दरम्यान, आरसीबीने आयपीएल जिंकल्यानंतर विजय मल्ल्याने (Vijay Mallya) एक मुलाखत दिलीये. ही मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलीये. ज्यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्याविषयी मोकळेपणाने भाष्य केलंय. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की विजय माल्या (Vijay Mallya) हे बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे नातेवाईक असल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे, या अभिनेत्रीने गुपचूप विवाह उरकलेला असताना विजय मल्ल्याने तिचं कन्यादान केलं होतं.
विजय मल्ल्याने कन्यादान केलेली ही अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डी. समीरा हिने ‘आक्रोश’, ‘तेज’, ‘दे दना दन’, ‘मैंने दिल तुझको दिया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2014 मध्ये ‘डीएनए’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने उघड केलं की, तिच्या लग्नात विजय मल्ल्यांनी कन्यादान केलं होतं. ते तिच्या आईकडील एकमेव नातेवाईक होते, जे त्या विवाह समारंभाला उपस्थित होते.
