कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ च्या ५५व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ उद्योग समूहाचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जांकुरकडील बॉयलरचा चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सुशीला रघुनाथ पाटील या उभयंतांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुण कुमार देसाई, संचालिका विनया घोरपडे, संचालक अनिल कुमार यादव, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, ॲड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु माने गावडे, ज्योती कुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संचालिका संगीता पाटील कोथळीकर,अस्मिता पाटील, संचालक इंद्रजीत पाटील, रणजीत कदम, महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील हालसवडे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मेस्त्री, कामगार प्रतिनिधी प्रदीप बनगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, को जन. मॅनेजर व्ही. आर. इंगळे यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी, श्री दत्त उद्योग समूहावर आपण प्रेम करणारी महाराष्ट्र कर्नाटक भागातील सभासद बंधू मंडळी, कार्यकर्ते, हितचिंतक मनापासून आणि उत्साहात या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी त्यांनी सर्व सभासद बंधूंना आपला सर्व ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी सर्वांचे स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी केले. आभार कामगार प्रतिनिधी प्रदीप बनगे यांनी मानले. याप्रसंगी श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर व त्यांचे पदाधिकारी शर्करा औद्योगिक श्रमिक संघ व कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी, डॉ. अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेचे संचालक व पदाधिकारी, दत्त भांडारचे सर्व पदाधिकारी आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
——————————
श्री दत्त शिरोळचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27.9
°
C
27.9
°
27.9
°
81 %
6.9kmh
99 %
Thu
28
°
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°

