कोल्हापूर :
येथील श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिरात उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत देवीच्या दर्शनासाठी देशभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली. या काळात श्री महालक्ष्मी अन्नछत्रातही भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे दोन लाख भाविकांनी मोफत भोजन प्रसादाचा लाभ घेतला.
भाविकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या श्री महालक्ष्मी अन्नछत्राने यंदाच्या उन्हाळी सुट्टीतही भक्तसेवेचा आदर्श कायम राखत हजारो भाविकांच्या भोजनाची यशस्वी व्यवस्था केली.
श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने अन्नछत्र व्यवस्थापनाने भोजनासाठी विशेष नियोजन केले होते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्नछत्राची वेळ दररोज दोन तासांनी वाढविण्यात आली होती. त्यामुळे हजारो भाविकांना सुरळीतपणे भोजनाचा लाभ घेता आला. अन्नछत्रात मसाले भात, आमटी, मिक्स भाजी, गव्हाची खीर, ताक आदी पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांनी भोजन व्यवस्थेचे तसेच अन्नाच्या गुणवत्तेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ७५ कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. यामध्ये संजय जोशी, राजेश सुगंधी, एस. के. कुलकर्णी, विराज कुलकर्णी, ॲड. तन्मय मेवेकरी, सतीश सरनाईक, सुनील खडके, चंद्रशेखर घोरपडे, आदित्य मेवेकरी, अतिश जाधव, ऋतुराज सरनोबत, प्रथमेश कुलकर्णी, प्रतीक गुरव आणि रजत जोशी यांनी विशेष संयोजन केले.
अत्यंत शिस्तबद्ध आणि नेटके नियोजन, स्वच्छता व तत्पर सेवा यामुळे भाविकांनी अन्नछत्र व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. तसेच कपिलतीर्थ परिसरातील व्यापारी वर्गानेही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
——————————
श्री महालक्ष्मी अन्नछत्रात सुमारे दोन लाख भाविकांनी घेतला मोफत भोजन प्रसादाचा लाभ
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

