Homeशैक्षणिक - उद्योग इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभाग उपाध्यक्षपदी डॉ. योगेश गोडबोले

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभाग उपाध्यक्षपदी डॉ. योगेश गोडबोले

कोल्हापूर :
इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या व्हा. चेअरमन (उपाध्यक्ष) पदी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोपाळ गोडबोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. पश्चिम विभागाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा तसेच दमण आणि दीव या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.
इंडियन डेअरी असोसिएशन ही देशातील दुग्ध व्यवसाय, दुग्ध विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, गुणवत्ता व्यवस्थापन आणि उद्योग विकासासाठी कार्य करणारी अग्रगण्य राष्ट्रीय संस्था आहे. दुग्ध क्षेत्रातील विविध घटकांमध्ये समन्वय साधणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच दुग्ध उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. डॉ. गोडबोले हे सध्या सुमारे ४२०० कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सन २०२१ पासून कार्यरत आहेत. गोकुळ हा देशातील आघाडीच्या सहकारी दुग्ध संस्थांपैकी एक मानला जातो. गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.
भारतीय दुग्ध उद्योगातील ३१ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. गोडबोले यांनी सहकारी, खाजगी आणि बहुराष्ट्रीय दुग्ध क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. दूध संकलन, गुणवत्ता व्यवस्थापन, दुग्धप्रक्रिया, विक्री-विपणन, पशुपालक सेवा आणि प्रशासकीय व्यवस्थापन या क्षेत्रांतील त्यांचा व्यापक अनुभव विशेष मानला जातो. ते इंडियन डेअरी असोसिएशन (वेस्ट झोन) तसेच डेअरी टेक्नॉलॉजी असोसिएशन, पुणे यांचे माजी समिती सदस्य असून त्यांनी डेअरी टेक्नॉलॉजी, एमबीए, एम.फिल. (अर्थशास्त्र) तसेच पीएच.डी. ही उच्च शैक्षणिक पात्रता संपादन केली आहे.
निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. योगेश गोडबोले यांनी इंडियन डेअरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे, दुग्ध क्षेत्रातील सहकाऱ्यांचे तसेच शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय गोकुळ दूध संघाच्या प्रगतीशील कार्यपद्धतीला, संस्थेच्या संचालक मंडळाला, प्रशासकीय यंत्रणेला तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला दिले. गोकुळने दुग्ध क्षेत्रात उभारलेली विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दूध उत्पादक हिताच्या उपक्रमांमुळेच राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पश्चिम विभागातील दुग्ध व्यवसाय अधिक तंत्रज्ञानाधारित, गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत करण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधून कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29 ° C
29 °
28.9 °
74 %
3.6kmh
2 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page