कोल्हापूर :
फिट इंडिया अंतर्गत जागतिक सायकल दिवस (३ जून) व पर्यावरण दिन (५ जून) यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.५) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सायकल रॅलीची सुरुवात सकाळी ७:३० वाजता मिरजकर तिकटी येथून होणार असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. रॅलीचा मार्ग मिरजकर तिकटी – बिनखांबी गणेश मंदिर – पापाची तिकटी – महानगरपालिका चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – बिंदू चौक – दसरा चौक – व्हिनस कॉर्नर – फोर्ड कॉर्नर – उमा टॉकीज – सावित्रीबाई फुले आरोग्य केंद्र मार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियम असा राहणार आहे.
कोल्हापूर शहरातील सायकलपटू, खेळाडू, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने या सायकल रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
सायकल व पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी सायकल रॅली
Mumbai
light rain
28.1
°
C
28.1
°
28.1
°
83 %
9.1kmh
93 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°

