कोल्हापूर :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने देशभरातील क्रिकेट विश्लेषकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वर्कशॉप फॉर परफॉर्मन्स ॲनालिस्ट या विशेष कार्यशाळेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)चे खेळाडू, स्कोरर आणि व्हिडीओ ॲनालिस्ट स्वप्नील कदम यांची निवड झाली आहे.
ही कार्यशाळा कर्नाटकातील बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली असून, भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली ती पार पडणार आहे.
स्वप्नील कदम यांच्या निवडीमुळे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रिकेटमधील आधुनिक तांत्रिक विश्लेषण, कामगिरीचे मूल्यमापन आणि डेटा-आधारित प्रशिक्षण पद्धतींबाबत या कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोल्हापूरच्या स्वप्नील कदम यांची क्रिकेट विश्लेषक कार्यशाळेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
31.2
°
C
31.2
°
31.2
°
62 %
5kmh
1 %
Mon
31
°
Tue
32
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
30
°

