Homeइतरपहिल्यांदाच १०० दृष्टिहीन मुलांनी घेतला मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्याचा अनुभव

पहिल्यांदाच १०० दृष्टिहीन मुलांनी घेतला मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्याचा अनुभव

• रिलायन्स फाउंडेशनचा ESA सामना ठरला आनंदाचा उत्सव
कोल्हापूर :
रविवारी वानखेडे स्टेडियममध्ये केवळ क्रिकेटचा थरार नव्हता, तर २० हजारांहून अधिक मुलांचा उत्साह, आनंद आणि जल्लोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. मुंबई इंडियन्सच्या वार्षिक Education and Sports for All (ESA) सामन्यात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या मुलांनी आपल्या आवडत्या खेळाडूंचा सामना प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद घेतला. हा उपक्रम मुंबई इंडियन्स आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यंदा प्रथमच १०० दृष्टिहीन मुलांनी त्यांच्या ‘हिअरिंग बडीज’सोबत सामना पाहण्याचा अनुभव घेतला. तसेच २०० हून अधिक विशेष सक्षम मुलांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. ही मुले मुंबईसह सातारा, नाशिक, इगतपुरी आणि इतर दुर्गम भागांतून आली होती.
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा निता अंबानी यांनी सांगितले की, मुलांचा आनंद आणि उत्साह या दिवसाला अधिक खास बनवतो. त्या म्हणाल्या की, ESA उपक्रमाची सुरुवात १६ वर्षांपूर्वी झाली असून समावेशकता हा त्याचा नेहमीच महत्त्वाचा भाग राहिला आहे. दृष्टिहीन मुलांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, “ही मुले इथून अनेक सुंदर आठवणी घेऊन जातील, अशी मला आशा आहे.”
या आयोजनासाठी व्यापक स्तरावर तयारी करण्यात आली होती. मुलांच्या प्रवासासाठी ५५० हून अधिक बेस्ट बसची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे २४०० स्वयंसेवक, १०० हून अधिक वैद्यकीय कर्मचारी, ९२ हजार फूड बॉक्स तसेच मोठी ग्राउंड टीम दिवसभर व्यवस्थापनासाठी कार्यरत होती. याशिवाय मुंबई पोलिसांनी १००० हून अधिक पोलीस आणि वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29 ° C
29 °
28.9 °
74 %
3.6kmh
2 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page