कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर. के. कामत यांनी सोमवारी विवेकानंद महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी डॉ. कामत यांचे पुष्पगुच्छ, शाल, संस्थेचे मानचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी त्यांनी कुलगुरु डॉ. कामत यांच्या शैक्षणिक योगदानाचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठात कुलगुरु म्हणून नियुक्ती झालेले डॉ. कामत हे संस्थेच्या विवेकानंद कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच डॉ. कामत यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणूनही सेवा बजावली आहे. या विद्यापीठाच्या एकूण १४ कुलगुरुंपैकी ५ कुलगुरु हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत.
याप्रसंगी डॉ. कामत म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांची शिदोरी सोबत घेऊन विद्यार्थी ते कुलगुरु पदापर्यंतचा माझा प्रवास झाला आहे. मी या संस्थेचा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेतील अनेक गुरुदेव कार्यकर्ते हे कुलगुरु होण्याच्या पात्रतेचे आहेत. त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा विचार अंगिकारुन विवेकानंद कॉलेजचा तसेच संस्थेचा नावलौकिक वाढवावा.
यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, कोल्हापूर विभागप्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. एस. एम. गवळी, आजीव सेवक डॉ. आर. व्ही. शेजवळ, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे, प्रा. महेश साळुंखे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील व सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर. के. कामत यांची विवेकानंद कॉलेजला सदिच्छा भेट
RELATED ARTICLES
Mumbai
haze
34
°
C
34
°
33.9
°
59 %
5.7kmh
40 %
Tue
33
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
31
°
Sat
31
°

