• पाच दिवसांत सुमारे ४० लाखांची उलाढाल
कोल्हापूर :
कृषी पणन मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मिलेट व फळ महोत्सवाला शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजारामपुरी येथील भारत हाऊसिंग सोसायटी हॉलमध्ये दि. २२ ते २६ एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या या महोत्सवात पाच दिवसांत सुमारे ४० लाख रुपयांची उलाढाल झाली.
या महोत्सवात राज्यातील विविध भागांतून मिलेट (नाचणी, ज्वारी, बाजरी आदी) उत्पादन करणारे शेतकरी तसेच फळ उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्राहकांसाठी मिलेटपासून तयार केलेले विविध पौष्टिक पदार्थ उपलब्ध होते.
तसेच फळांमध्ये मुख्यतः आंबा, सफेद जांभूळ, द्राक्षे, डाळिंब, पेरू, स्ट्रॉबेरी, अंजीर यांसारख्या ताज्या फळांची विक्री करण्यात आली. एकूण ४५ स्टॉल्स या प्रदर्शनात उभारण्यात आले होते, ज्यांना ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे मिलेट पाककृती स्पर्धा. या स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ. अहिल्या वाघमोडे, डॉ. प्रतिभा ठोंबरे, पूजा सावंत, तृप्ती कोळेकर आणि जयश्री करे यांनी काम पाहिले. स्पर्धेत सोनल भोसले (प्रथम क्रमांक), मयुरी रानमाळे (द्वितीय), श्रेया पोफळे (तृतीय) तर दिपाली देसाई (उत्तेजनार्थ बक्षीस) यांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क साधला गेला, तसेच पौष्टिक मिलेट उत्पादनांविषयी जनजागृतीही झाली. महोत्सवास लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी शहरवासीयांचे आभार मानले.
मिलेट व फळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

