कोल्हापूर :
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ज्ञानामृत’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन मदनदादा भोसले व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. डॉ. झांबरे यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचले पाहिजे या उद्देशाने ‘ज्ञानामृत’ हा गौरवग्रंथ लिहिला गेला.
संस्थाध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या हस्ते प्रा. डॉ. झांबरे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले व त्यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, संचालक केशवराव पाडळे, सुरेश यादव, उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, स्टाफ सेक्रेटरी डॉ. शिवाजी ताटे, ज्ञानामृत या ग्रंथाचे संपादक डॉ. संदीप वाटेगांवकर, सहसंपादक प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे आणि डॉ. संग्राम थोरात आदींसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मदनदादा भोसले, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्यासह अनेकांनी डॉ. झांबरे यांच्या विषयी मनोगते व्यक्त करून, त्यांच्या जीवनावर व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. सत्काराला उत्तर देताना गौरवमूर्ती डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी ताटे यांनी केले तर गौरवग्रंथाविषयी माहिती डॉ. संदीप वाटेगावकर यांनी दिली. मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मंजुषा इंगवले यांनी केले तर आभार प्रा. संदीप पातूगडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी अप्तेष्ट मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
प्रा.डॉ. ज्ञानदेव झांबरे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
3.1kmh
11 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

