HomeUncategorizedजोतिबा आणि अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

जोतिबा आणि अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

कोल्हापूर :
जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाइन आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, या विकास आराखड्यांतर्गत जी कामे सुरू आहेत, ती अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत; तसेच सुरू असलेल्या कामांमध्ये स्थानिक लोकांना विश्वासात घेण्यात यावे. ज्योतिबा मंदिर परिसरात अतिक्रमण आहे का, तसेच त्या ठिकाणी रस्त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे का, याची माहितीही त्यांनी यावेळी जाणून घेतली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गुरव यांनी येत्या १६ मे पासून जनगणनेचे काम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी अंबाबाई देवस्थान परिसरातील जागांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. तर प्रशासनाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादनाबाबत दोन बैठका झाल्या असल्याची माहिती करवीरच्या प्रांताधिकारी श्रीमती बर्डे-चौगुले यांनी या बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी राठोड यांनी यावेळी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या सद्यस्थितीचा बारकाईने आढावा घेतला. या बैठकीसाठी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. मस्कर तसेच आर्किटेक्ट रेवा पेठे यांच्यासह संबंधित विभागांचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित हो

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
81 %
8.1kmh
100 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page