Homeशैक्षणिक - उद्योग सीबीएसई बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

सीबीएसई बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

कोल्हापूर :
सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावीच्या परीक्षेत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या परीक्षेत श्रेया सचिन घाटगे या विद्यार्थिनीने ९९% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. शुभंकर अवधूत कोरडे (९८.६०%) याने द्वितीय क्रमांक मिळवला. तर ईशान व्यंकटेश तारकसबंद, नमन योगानंद फुलारी, पृथ्वीराज संग्राम पाटील, जैनी मुकेशकुमार बालर आणि यश पवन पाटील या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९८.४०% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
विषयानुसार ‘पैकीच्या पैकी’ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात सर्वाधिक ५४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले. मराठी विषयात २०, संस्कृतमध्ये २०, इंग्रजीमध्ये ११, विज्ञान विषयात २ तर फ्रेंचमध्ये २ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले.
या यशाबद्दल बोलताना संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती म्हणाल्या की, योग्य नियोजन, सराव परीक्षा, उत्कृष्ट अध्यापन, साप्ताहिक व पाठावर आधारित चाचण्या, विद्यार्थ्यांचे परिश्रम व पालकांचा विश्वास यामुळेच शाळेचा उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. तसेच शाळेच्या गुणवत्तेमध्ये अधिकाधिक भर पडत आहे.
या यशाबद्दल चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी संचालिका सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यश मिळाल्याची भावना यावेळी चेअरमन संजय घोडावत यांनी व्यक्त केली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
28.2 ° C
28.2 °
28.2 °
69 %
4.1kmh
79 %
Sun
31 °
Mon
30 °
Tue
30 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

You cannot copy content of this page