Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजमध्ये अर्पिता हावळ यांचा  सत्कार

विवेकानंद कॉलेजमध्ये अर्पिता हावळ यांचा  सत्कार

कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजची माजी विद्यार्थिनी अर्पिता सचिन हावळ हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कर सहायक व महसूल सहायक या पदांसाठी निवड झाली.  त्याबद्दल तिचा विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात  आला.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अर्पिताने मिळविलेले हे यश अभिमानास्पद आहे. तिच्या या यशामुळे विवेकानंद कॉलेजच्या नावलौकिकात भर पडली आहे.  तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो.
अर्पिता हावळचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर आंबेवाडी (ता. करवीर) येथे तर माध्यमिक शिक्षण राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, जुना बुधवार, कोल्हापूर येथे झाले. तिने विवेकानंद महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून कोणत्याही क्लासशिवाय तिने घरीच राहून अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात तिने मिळविलेले घवघवीत यश निश्चितच कौतुकास्प्द आहे. या यशाबद्दल तिचे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
81 %
7.7kmh
100 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page