Homeकला - क्रीडाशिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या फुटबॉल प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ

शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या फुटबॉल प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ

कोल्हापूर:
शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित मोफत फुटबॉल शिबिराचा राजोपाध्येनगर ग्राऊंड, सानेगुरुजी वसाहत येथे आज सकाळी उत्साहात शुभारंभ झाला. कर्नल दिलीप थोरात यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संग्रामसिंह खर्डेकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
यावेळी आरोग्यदूत बंटी सावंत, अकॅडमीचे अध्यक्ष, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील, उदय पाटील, किरण साळोखे, प्रमोद भोसले, सुशील गायकवाड, आशिष पाटील, शशिकांत नलवडे, संतोष कामते आदी उपस्थित होते.
राजोपाध्येनगर ग्राऊंड, सानेगुरुजी वसाहत येथे सकाळी ७ ते ९ या वेळेत सुरू असलेले हे शिबिर १५ मे २०२६ पर्यंत चालणार असून, १२ ते १६ वयोगटातील मुलांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. यंदा शिबिराचे २७वे वर्ष आहे. शिबिरात अनुभवी खेळाडूंकडून मार्गदर्शन केले जात आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31.2 ° C
31.2 °
31.2 °
68 %
6.8kmh
64 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
31 °

Most Popular

You cannot copy content of this page