कोल्हापूर :
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने डिजिटल गोल्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी जियोफायनान्सने खास ऑफर जाहीर केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या मोहिमेत ग्राहकांना अतिरिक्त सोने, रिवॉर्ड पॉइंट्स आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर १९ ते २१ एप्रिल २०२६ दरम्यान लागू राहील आणि खरेदी जियोफायनान्स ॲपद्वारे करता येईल.
या ऑफरअंतर्गत ₹२,००० किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचे डिजिटल गोल्ड खरेदी केल्यास ग्राहकांना १% अतिरिक्त सोने दिले जाईल. हे अतिरिक्त सोने कमाल ₹१,००० पर्यंत मर्यादित असेल आणि चार कामकाजाच्या दिवसांत ग्राहकांच्या जियोगोल्ड खात्यात जमा केले जाईल. याशिवाय, ₹५,००० किंवा त्याहून अधिक रकमेची एकरकमी गुंतवणूक केल्यास ग्राहकांना दुप्पट जियोपॉइंट्स मिळतील. तसेच, एप्रिल महिन्यात ₹१,५००किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या SIP गुंतवणुकीवरही २x जियोपॉइंट्सचा लाभ दिला जाईल. प्रति ग्राहक दरमहा कमाल ५,००० पॉइंट्सची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
कंपनीने सांगितले की, ₹१०,००० किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करणारे ग्राहक ‘अक्षय तृतीया मेगा ड्रॉ’मध्ये सहभागी होऊ शकतात. या ड्रॉमध्ये ५ विजेत्यांना २४ कॅरेटचे १ ग्रॅम डिजिटल गोल्ड बक्षीस म्हणून दिले जाईल. हे बक्षीस ३० एप्रिल २०२६ रोजी विजेत्यांच्या जियोगोल्ड खात्यात जमा केले जाईल.
जियोगोल्ड हे असे एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे ग्राहक फक्त ₹१० पासून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात आणि गरजेनुसार ते रोख रक्कम किंवा सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपात रिडीम करू शकतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी जियोफायनान्स ॲप डाउनलोड किंवा अपडेट करणे आवश्यक आहे.
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जियोफायनान्सची आकर्षक ऑफर
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29.2
°
C
29.2
°
29.2
°
63 %
1.5kmh
9 %
Sun
30
°
Mon
31
°
Tue
30
°
Wed
30
°
Thu
30
°

