• वेताळमाळ – दिलबहार आज जेतेपदासाठी लढत
कोल्हापूर :
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना वेताळमाळ तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात होत आहे. विजेतेपदासाठी दोन्ही संघात होणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारणार आणि दोन लाख रुपयांच्या बक्षिसासह सतेज चषक कोण पटकाविणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. बुधवारी (दि. १५) दुपारी चार वाजता छत्रपती शाहू स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
यंदाच्या हंगामात दोन्ही संघ प्रथमच विजेतेपदासाठी आमनेसामने येत आहेत, त्यामुळे सामन्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला. सतेज चषक २०२५च्या स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ विजेता तर खंडोबा तालीम मंडळ उपविजेता ठरले होते. यंदाच्या स्पर्धेत वेताळमाळने गतवेळच्या विजेत्या पाटाकडीलचे आव्हान संपुष्टात आणले तर उपविजेत्या खंडोबाला दिलबहारने पराभवाचा धक्का दिला आहे. अशाप्रकारे अंतिम फेरीत पोहोचलेल्या वेताळमाळ आणि दिलबहार यांच्यातील विजेतेपदासाठीच्या लढतीबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख २ लाख रुपये आणि सतेज चषक देण्यात येणार आहे, तर उपविजेत्या संघाला १ लाख रुपये व चषक प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ प्रतिष्ठेची नव्हे, तर मोठ्या बक्षिसाचीही ही लढत ठरणार आहे. दोन लाखांच्या बक्षिसासह सतेज चषकाचा मानकरी कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, फुटबॉलप्रेमींमध्ये अंतिम सामन्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
——————————
दोन लाखांसह सतेज चषकाचा मानकरी कोण?
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

