Homeशैक्षणिक - उद्योग ए.आय. - बायोमेकॅनिक्सचा योग्य समन्वय गरजेचा : डॉ.सुदीप काळे

ए.आय. – बायोमेकॅनिक्सचा योग्य समन्वय गरजेचा : डॉ.सुदीप काळे

• डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे ‘फिजिओसेतू २०२६’ राष्ट्रीय परिषद संपन्न
कोल्हापूर :
फिजिओथेरपीस्ट हा आरोग्य सेवेतील अविभाज्य घटक बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए. आय.) वापर आरोग्य सेवेत वाढत असून फिजीथेरेपीमध्येही त्याचा वापर अपरिहार्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बायोमेकॅनिक्स यांच्या एकत्रित वापर व समन्वय यामुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावी, अचूक आणि रुग्णकेंद्रित होऊ शकेल असा विश्वास तेरणा कॉलेज ऑफ फिजीओथेरपी, नवी मुंबईचे विभाग प्रमुख डॉ. सुदीप काळे यांनी केले.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे आयोजित ‘फिजिओसेतू २०२६’ या राष्ट्रीय परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
‘बायोमेकेनिक्स आणि ए. आय.  समन्वय चा: मानवी कार्यक्षमता आणि आरोग्यातील नवे क्षितिज या विषयावर हि परिषद झाली. डॉ. सुदीप काळे, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू स्वप्नील पाटील, प्राचार्य डॉ. अमृतकुंवर एस. रायजादे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत परिषदेचे उदघाटन झाले.
प्राचार्य डॉ. अमृतकुंवर एस. रायजादे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. हि परिषद वर्तमान ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञान यांना जोडणारा ‘सेतू’ असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने प्रतिनिधी सहभागी झाले होते.
अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू स्वप्नील पाटील म्हणाले, क्रीडाक्षेत्रात फिजिओथेरपी अनन्यसाधारण महत्व आहे. क्रीडा क्षेत्रात कार्यक्षमता वाढविणे, दुखापती टाळणे आणि प्रभावी पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी फिजिओथेरपीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे बाल फिजिओथेरपी प्रमुख डॉ. मंदार मालवाडे यांनी बालविकासातील संवेदन प्रक्रियेचे महत्त्व, मुलांमधील संवेदन समस्या हाताळण्याचे उपाय यावर तर के. एल. ई. इंस्टीटयूट स्पोर्ट्स फिजिओथेरपीचे विभागप्रमुख डॉ. बसवराज मोतिमठ यांनी स्नायू व खेळाशी संबंधित दुखापतींवर टेपिंग तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुण्याचे प्राचार्य डॉ. तुषार पालेकर, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, लातूरचे प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कराडचे अधिष्ठाता डॉ. जी. वर्धराजुलू, डॉ. अरुण माहिया, केएलई कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हुबळीचे प्राचार्य डॉ. प्रशांत मुकन्नावार, सिम्बॉयसिस कॉलेज संचालक डॉ. अपूर्व शिंपी, भारती विद्यापीठ सांगलीच्या डॉ. स्नेहा कटके, डॉ. उमाजली दामके, डॉ. रिंकले मालानी, डॉ. नितेश बंसल, डॉ. संतोष मेतगुड, डॉ. प्रियांशू राठोड, डॉ. लोपादास, हिमानी त्यागी यांनीही या परिषदेत वेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले
परिषदेत ५० हून अधिक संस्थांचे ७५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. सुमारे २५० संशोधन पेपर व पोस्टर सादरीकरणे तसेच १८ मॉडेल सादरीकरणे पार पडली. एआय आधारित उपचारपद्धती, क्रीडा दुखापती, मोशन कॅप्चर तंत्रज्ञान आणि पुनर्वसनातील आधुनिक तंत्र यांवर चर्चा करण्यात आली. फिजिओथेरपी विषयक दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. या परिषदेत ‘यंग अचिव्हर’, ‘बेस्ट एज्युकेटर’, ‘सायंटिफिक कॉन्ट्रिब्युशन’, ‘एक्सलंस इन रीहेबलेशन’ आणि ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ अशा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
34 ° C
34 °
31.9 °
43 %
6.2kmh
0 %
Wed
34 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
31 °
Sun
32 °

Most Popular

You cannot copy content of this page