कोल्हापूर :
राहूल पाटीलने नोंदवलेल्या एकमेव गोलच्या जोरावर वेताळमाळ तालीम मंडळने बालगोपाल तालीम मंडळला पराभूत करून सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. राहूल पाटीलला सामनावीरचा बहूमान मिळाला.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या बालगोपाल आणि वेताळमाळ यांच्यातील सामन्यात वेताळमाळने बालगोपालवर एकमेव गोलने मात करून स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या पण गोलची कोंडी फुटली नाही. बालगोपालकडून के. लालरिनफेला, ऋतुराज पाटील, अभिनव साळोखे यांच्या सोप्या संधी वाया गेल्या. वैभव देसाईने सेंटरपासून मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टवरून गेला. वेताळमाळच्या आकाश माळी, सर्वेश वाडकर, राहूल पाटील यांनी केलेल्या चढायांना यश मिळाले नाही. आकाश मोरेच्या पासवर शोएब बागवानने हेडव्दरा गोलचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरला.
उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला. यामध्ये राहूल पाटीलने सेंटरपासून चेंडू घेऊन खोलवर चढाई केली आणि गोल नोंदवून संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. ४९व्या मिनिटाला मिळालेल्या आघाडीनंतर त्यांच्या सर्वेश वाडकर, आकाश माळी, योक्षिम अवुंगशी, शोएब बागवान यांनी केलेल्या चढाया समन्वयाअभावी वाया गेल्या. रेहान मुजावरच्या फ्रिकिक पासवर आकाश माळीने मारलेला चेंडू गोलपोस्टजवळून गेला. गोलची परतफेड करण्यासाठी बालगोपालच्या रोहित कुरणे, लालरिनफेला, देवराज मंडलिक, ऋतुराज पाटील, अभिनव साळोखे यांनी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. लालरिनफेलाच्या दोन-तीन सोप्या संधी हुकल्या. अखेर उर्वरित वेळेत १-०ची आघाडी राखत वेताळमाळने सामना जिंकला.
——————————
आजचा सामना…
• खंडोबा – जुना बुधवार : दुपारी ४ वाजता
वेताळमाळची उपांत्य फेरीत धडक
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8
°
C
28.8
°
28.8
°
80 %
8.4kmh
70 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°

