Homeइतरके. मंजूलक्ष्मी यांनी घेतले काडसिद्धेश्वर स्वामीजींचे आशीर्वाद

के. मंजूलक्ष्मी यांनी घेतले काडसिद्धेश्वर स्वामीजींचे आशीर्वाद

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेत गेली तीन वर्ष आयुक्त व प्रशासक म्हणून कामकाज पाहिलेल्या के. मंजूलक्ष्मी यांची नुकतीच पुणे महानगर येथे बदली झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी श्रीक्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी येथे भेट देवून पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या सोबत चर्चा केली व भविष्यातील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले.
सिद्धगिरी कारागिर महाकुंभ नुकताच सिद्धगिरी मठावर पार पडला. या उत्सवात भारतातील १७ राज्यातून कारागिर सहभागी झाले. या उत्सवाला नियोजित कार्यक्रमामुळे बाहेर असल्यामुळे सहभागी होता आले नाही याची खंत के. मंजूलक्ष्मी यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी स्वामीजींनी भविष्यात कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने कायमस्वरूपी असे प्रदर्शन कोल्हापुरात नेहमी भरावे यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेत काम करत असताना त्यांनी घेतलेले विविध अनुभव यावेळी व्यक्त केले. महापालिकेचा पदभार स्वीकारला त्यावेळी मुख्य प्रशासक म्हणून त्यांनी विविध अंगानी शहराच्या विकासात दिलेले योगदान व वाटचाल सांगितली. यावेळी विवेक सिद्ध, सुजित पाटील, अनुराधा शिंदे व दयानंद डोंगरे उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8 ° C
28.8 °
28.8 °
80 %
8.4kmh
70 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page