Homeइतरशहीद जवान अक्षय चौगुले यांच्या पार्थिवाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले अंत्यदर्शन

शहीद जवान अक्षय चौगुले यांच्या पार्थिवाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले अंत्यदर्शन

कोल्हापूर :
कडगांव (ता. गडहिंग्लज) येथील सुपुत्र व दिल्ली- मेरठ येथे कर्तव्यावर असलेले जवान अक्षय विलास चौगुले यांचे तीन दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. शनिवारी त्यांचे पार्थिव गावी पोहोचले. कडगांवमध्ये पोहोचत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ऐन तरुण वयातच जवान अक्षय विलास चौगुले यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळलेला आहे. समाज म्हणून आपण सर्वजण या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहूया. ऊन, वारा, पाऊस, बर्फ, थंडी अशा अनेक संकटांनी चहुबाजूने घेरलेले असतानाही भारतमातेच्या संरक्षणासाठी तळहातावर प्राण घेऊन सैनिक लढत असतात. अशा आजी-माजी सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हे आपणा सर्वांचे सामाजिक कर्तव्य आहे.
यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, गोड साखरचे चेअरमन प्रकाशभाई पताडे, जिल्हा परिषद सदस्य सौ. शैलजा पाटील, गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण – आगलावे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, सदानंद पाटील, बंटी पाटील, नेताजी पाटील, भीमराव राजाराम, आनंदा पाटील, संजय बटकडली, अजित जामदार आदी प्रमुखांसह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
29.9 °
54 %
4.6kmh
20 %
Sun
30 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
29 °

Most Popular

You cannot copy content of this page