• सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर :
वेताळमाळ तालीम मंडळने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळला ३-० गोलने तर प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळला ७-० ने पराभूत करून सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. वेताळमाळच्या आकाश माळी तसेच प्रॅक्टीस क्लबच्या साहिल डाकवे यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उदघाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शिवसेनेचे विजय देवणे, रविकिरण इंगवले, डॉ . भरत कोटकर, नगरसेवक राजू लाटकर, प्रतिज्ञा उत्तुरे, इंद्रजीत बोंद्रे, सुनील मोदी यांच्यासह सचिन चव्हाण, एकनाथ पाटील, पाटाकडील तालीम मंडळचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष संदीप सरनाईक, शरद माळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारी झालेल्या वेताळमाळ आणि उत्तरेश्वर संघातील सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिला. दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या पण गोलची कोंडी फुटली नाही. उत्तरार्धात सामना सुरु होताच झालेल्या चढाईत आकाश माळीने दिलेल्या पासवर सर्वेश वाडकरने मोठ्या डी बाहेरून मारलेल्या फटक्यावर चेंडू थेट गोलजाळ्यात शिरला. सर्वेशने सहजपणे गोल नोंदवून ४१व्या मिनिटाला वेताळमाळला आघाडी मिळवून दिली. चढाईतील सातत्य राखत आकाश माळीने संघाचा दुसरा गोल ६४व्या मिनिटास केला. गोलक्षेत्रात दोघां खेळाडूंना चकवा देत आकाशने गोल नोंदवून आघाडी वाढवली. वेताळमाळकडून राहुल पाटील, योक्षिम अवुंगशी, संदेश कासार हे फिनिशिंअभावी गोल करण्यात अपयशी ठरले. दरम्यान, उत्तरेश्वरकडून शेल्टॉन पॉल, विश्वदीप भोसले, इलेन्स शर्मा, विक्रम व्ही., अर्थव पाटील यांनी खोलवर चढाया केल्या पण समन्वयाचा अभाव आणि दिशाहीन फटाक्यांमुळे त्या वाया गेल्या. शेल्टॉन पॉलने डी बाहेरून मारलेल्या फ्रिकिकवरचा चेंडू गोलरक्षक विशाल कुरणेने झेपावत बाहेर काढून गोलचे संकट दूर केले. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या आकाश मोरेच्या पासवर अभिषेक सावंतने हेडव्दारा गोल नोंदविला. जादावेळेत झालेल्या या गोलनंतर उर्वरित वेळेत ३-०ची आघाडी राखत वेताळमाळने सामना जिंकला.
प्रॅक्टीसचा एकतर्फी विजय….
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात प्रॅक्टीस क्लबने मर्दानी खेळाचा आखाडावर ७-० असा एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये अजिंक्य नलवडेने तीन गोल नोंदवून महत्वपूर्ण कामगिरी केली. प्रॅक्टीसकडून साहिल डाकवेने १२ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. त्यानंतर अजिंक्य नलवडेने ३६व्या मिनिटाला गोल करून आघाडी २-० वर नेली. पूर्वार्धातील आघाडीच्या जोरावर उत्तरार्धात प्रॅक्टीस क्लबने दमदार खेळ केला. त्यांच्या सागर चिलेने ४८व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी ३-० अशी वाढवली. त्यानंतर ६०व्या मिनिटाला अजिंक्य नलवडेने वैयक्तिक दुसरा तर संघाचा चौथा गोल केला. रोहित भोसलेने ६४व्या मिनिटास संघाचा पाचवा गोल नोंदवून आघाडी भक्कम केली. ७०व्या मिनिटाला अजिंक्य नलवडेने वैयक्तिक तिसरा तर संघाचा सहावा गोल नोंदविला. अखेर ७४व्या मिनिटाला रोहित भोसलेने वैयक्तिक दुसरा तर संघाचा सातवा गोल नोंदवून विजयावर शिक्कामोर्तब केले. मर्दानी खेळाचा आखाडाकडून अक्षय सरनाईक, सुजल रणदिवे, रणवीर जाधव, संदिप जानकर, प्रविण साळोखे यांनी केलेल्या चढायांना यश आले नाही. अखेर ७-०ची आघाडी राखत प्रॅक्टीस क्लबने मोठा विजय साकारला.
——————————
• दिलबहार – संध्यामठ: दुपारी १:३० वा.
• पाटाकडील – रंकाळा: दुपारी ४ वाजता
——————————
वेताळमाळ आणि प्रॅक्टीस क्लबची विजयी सलामी
RELATED ARTICLES
Mumbai
haze
32
°
C
32
°
31.9
°
70 %
5.7kmh
40 %
Mon
31
°
Tue
31
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
31
°

