• देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार
कोल्हापूर :
कारागीर महाकुंभात पारंपारिक, हस्तकला, कला यातील स्थानिक कलाकार आपल्या कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करण्यासाठी याठिकाणी आले आहे. या उत्सवात उच्च व तंत्र शिक्षणातील सर्व महाविद्यालयांना हा उत्सव पाहण्यासाठी आणि सादरीकरण करण्यासाठी विभागाने सूचना दिल्या आहेत. हा महाकुंभ पहायला येणारे विद्यार्थी यातून निश्चितच प्रेरणा घेऊन जातील. एक स्टार्टअपची एक संकल्पना निश्चित लोकांच्या जीवनात या महाकुंभमुळे उतरेल. या कारागिरी महाकुंभाची फलनिष्पती म्हणून भविष्यात हजारो महिलांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत काही असे अभिनव कामकाज मिळेल असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्यावतीने दि.३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ संपन्न होत आहे. या महोत्सवाचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सिध्दगिरी येथे झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी पुज्यश्री काडसिध्देश्वर स्वामीजी, आ. राजेश क्षीरसागर, माजी आ. प्रकाश आवाडे, कोल्हापूर जि. प. अध्यक्षा शिल्पा खोत, सातारा जि. प. अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, डॉ. वर्षा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भारतातील १७ राज्यातून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अनेक कलाकार व त्यांच्या कला आणि हस्तकला या एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. कलाकारांचे कसब आणि कौशल्य यातून कलात्मक व आकर्षक अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच या वस्तूंची विक्रीही येथे आहे. कारागीर कुंभोत्सवामध्ये अश्या विविध राज्यातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. एकूण १७ राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त २०० हून कलाकार ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’मध्ये सामील होत आहेत. टेराकोटा, मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वुड कला, बांबू काम, लेदर वर्क विविध राज्यातील एंब्रॉयडरी पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला बाहुलींच्या प्रतिकात्मक ऐतिहासिक मुर्ती, स्टोन वर्क, कच्छमधील राबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्नपासून वस्तू, मधुवेनी पेंटिंग, लाकेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या इत्यादी हस्तकलेचे विविध प्रकार येथे बघायला मिळतील.
या कार्यक्रमात तंत्र महाविद्यालय, महाविद्यालय, पॉलिटेक्नीक, अभियांत्रिकी महाविद्यालय, आय.टी.आय. यात शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींनी या कारागीर महाकुंभात सहभाग घेतला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना स्टार्टअप करिता दहा लाखाचे अर्थसहाय्य करण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याचे सांगितले.
या सिध्दगिरी कारागिर महाकुंभ उदघाटन सोहळ्यात प्रास्ताविक यशोवर्धन बारामतीकर यांनी तर सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालानयचे उपसंचालक भरत लांगे, शशिकांत पुजारी, शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील, राहुल चिकोडे, गुंडोपंत वद्द, विक्रम पाटील, एकत्वं इन्फ्राचे
सिध्दगिरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा ठरेल !! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
Mumbai
smoke
30
°
C
30
°
29.9
°
51 %
5.7kmh
40 %
Mon
30
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

