Homeकला - क्रीडा'सालबर्डी' मराठी चित्रपट १७ एप्रिलपासून

‘सालबर्डी’ मराठी चित्रपट १७ एप्रिलपासून

कोल्हापूर :
इतिहासाच्या अंधाऱ्या कप्प्यांत दडलेली काही रहस्ये… काळाच्या पडद्याआड कायमची हरवलेलीच राहतात. पण जेव्हा या रहस्यांच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा केवळ उत्तरं मिळत नाहीत तर नव्या, धक्कादायक प्रश्नांची मालिका उभी राहते. याच गूढतेच्या धाग्यांना पकडत, सत्याच्या शोधात निघालेली एक थरारक कहाणी आता ‘सालबर्डी’ या चित्रपट रूपाने समोर येत आहे. १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘सालबर्डी’ हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.
चित्रपटाची कथा इतिहासाच्या अंधाऱ्या कप्प्यांत दडलेल्या रहस्यांभोवती फिरत असून, त्या उलगडण्याचा प्रयत्न करताना समोर येणारे धक्कादायक सत्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. ‘सालबर्डी’ चित्रपटामध्ये पूजा सावंत पोलिसांच्या वर्दीत झळकणार असून, गुन्ह्यांच्या गुंतागुंतीत शिरून सत्याचा शोध घेणारी तिची पीआय मनोरमा प्रधान ही भूमिका चित्रपटाच्या कथानकाला एक वेगळीच धार देणार आहे. याशिवाय या चित्रपटात शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page