कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ परिवाराच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात व सेवाभावी वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, चेअरमन नविद मुश्रीफ तसेच संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले.
या वाढदिवसाच्या निमित्ताने गोकुळ परिवाराच्यावतीने ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयाच्या प्रांगणात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सीपीआर रुग्णालय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी यांना फळे व सुगंधी दूध वाटप करण्यात आले. बालकल्याण संकुल येथे मुलांसाठी जीवनावश्यक व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास गोकुळचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांद्वारे गोकुळ परिवाराने वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श निर्माण केला आहे.
याप्रसंगी चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, बालकल्याण संकुलच्या मानद कार्यवाह श्रीमती पद्मजा तिवले, पी. के. डवरी, सचिन माने, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. पी. जे. साळुंके, सहा. व्यवस्थापक संकलन दत्तात्रय वागरे, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, डॉ. एम. पी. पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
——————————
गोकुळ परिवारातर्फे मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा
Mumbai
light rain
28.8
°
C
28.8
°
28.8
°
79 %
8kmh
28 %
Sun
28
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

