Homeसामाजिकमंगळवारपासून कणेरी मठावर 'सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’

मंगळवारपासून कणेरी मठावर ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’

• देशभरातील दुर्मिळ कारागिरी एकाच ठिकाणी पाहायला मिळणार
कोल्हापूर :
श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्यावतीने दि. ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत कणेरी मठ येथे ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ संपन्न होत असल्माची माहिती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले की, या कारागीर महाकुंभात पारंपारिक, हस्तकला, कला यातील स्थानिक कलाकार आपल्या कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करतील. कारागीर कुंभोत्सवामध्ये विविध राज्यातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. १७ राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त २०० हून कलाकार ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’मध्ये सहभागी होत आहेत. कारागीर कुंभामध्ये असे कलाकार आपल्या कलेचे प्रत्यक्षरित्या  प्रदर्शन करतील. परंतु त्यासोबत अशा कलेतून तयार केलेले वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध करतील. आणि म्हणून या कारागीर महाकुंभाला प्रत्येकाने भेट देणे आवश्यक आहे.
टेराकोटा, मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वुड कला, बांबूकाम, लेदर वर्क विविध राज्यातील एंब्रॉयडरी पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला, बाहुलींच्या प्रतिकात्मक ऐतिहासिक मुर्ती, स्टोन वर्क, कच्छमधील राबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्नपासून वस्तू, मधुवेनी पेंटिंग, लाखेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या इत्यादी हस्तकलेचे विविध प्रकार या कारागीर महाकुंभामध्ये बघायला मिळतील.
प्रास्ताविकात विवेक सिद्ध म्हणाले की, तंत्र महाविद्यालय, महाविद्यालय, पॉलिटेक्नीक, अभियांत्रिकी महाविद्यालय, आय.टी.आय. यात शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना या कारागीर महाकुंभासाठी पाचारण केले आहे. जेणेकरून हे युवक-युवती या कलांचा अध्ययन करतील व या कलांमध्ये आधुनिकतेची जोड कशी देता येईल याचा विचार करतील. जेणेकरून या सर्व कलाआविष्कारांना छोटे-छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. म्हणून हा ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ एक आगळा वेगळा सोहळा आहे.
पत्रकार परिषदेला सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, मुख्यकार्यकारी अधिकारी जी. पी. वढड, विक्रम पाटील, प्रल्हाद जाधव, दयानंद डोंगरे, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, दिवाकर पाटील, पुनीत मुचंडी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
82 %
5.4kmh
98 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page