कोल्हापूर :
संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय महागाव (गडहिंग्लज) येथे आयोजित ‘हॅक फेस्ट-२६’ मध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी ‘आर्किटेक्चरल डिझाईन अँड मॉडेल मेकिंग’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप’ने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेमध्ये दिलेल्या विषयावर डिझाईन तयार करून त्याचे कार्यरत मॉडेल सादर करण्याचे आव्हान होते. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर संघाने ‘स्मार्ट बिल्डिंग’ या संकल्पनेवर आधारित ‘ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप’चे अभिनव डिझाईन सादर केले. या मॉडेलला उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघात स्वयंम सागर शितोळे, आस्तिक सिंग जाधोन, सुमित तुकाराम कदम व संकल्प राजेश खोत यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना आर्किटेक्ट संतोष आळवेकर, आर्किटेक्ट तन्वी शेटके, आर्किटेक्ट इंद्रजीत जाधव व आर्किटेक्ट तेजस पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील , विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख आर्कि. इंद्रजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा ‘ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप’ प्रथम
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.9
°
C
27.9
°
27.9
°
70 %
2.6kmh
52 %
Tue
30
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
32
°
Sat
30
°

