• मोबाईल आणि ब्रॉडबँड दोन्हीमध्ये नंबर वन : जेएम फायनान्शियल
कोल्हापूर :
ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलच्या अहवालानुसार, भारतीय दूरसंचार बाजारात रिलायन्स जिओची आघाडी अधिक भक्कम झाली आहे. ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मोबाईल सेवांसोबतच होम ब्रॉडबँड आणि ५जी फिक्स्ड वायरलेस इंटरनेट क्षेत्रातही कंपनी अव्वल स्थानावर कायम आहे.
जेएम फायनान्शियलच्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मधील सब्सक्रायबर अहवालातील ट्रेंड्स दर्शवतात की जिओने त्या महिन्यात सर्वाधिक नवीन मोबाईल ग्राहक जोडले. कंपनीत सुमारे १६ लाख नेट वायरलेस वापरकर्त्यांची वाढ झाली. तर भारती एअरटेलने सुमारे १२ लाख ग्राहक जोडले, तर व्होडाफोन आयडियाचे जवळपास ७ लाख ग्राहक कमी झाले. ही आकडेवारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या डेटावर आधारित आहे.
जेएम फायनान्शियलनुसार, ४१ टक्क्यांहून अधिक बाजारहिस्स्यासह जिओ देशातील सर्वात मोठी वायरलेस कंपनी राहिली आहे. अहवालात म्हटले आहे की एअरटेल दुसऱ्या स्थानावर आहे, तर व्होडाफोन आयडिया सातत्याने मागे पडत आहे.
होम ब्रॉडबँड क्षेत्रातही जिओची आघाडी कायम राहिली. जानेवारी महिन्यात कंपनीने सुमारे ७.८ लाख नवीन होम ब्रॉडबँड ग्राहक जोडले आणि एकूण सुमारे ४२ टक्के बाजारहिस्स्यासह अव्वल स्थान राखले. विश्लेषकांच्या मते, यामागे जिओएअरफायबरची वाढती मागणी हे प्रमुख कारण आहे.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की ५जी फिक्स्ड वायरलेस इंटरनेट म्हणजेच एअरफायबर बाजारात जिओचा ७० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे, ज्यामुळे कंपनीला सुरुवातीपासूनच मोठी आघाडी मिळाली आहे. विश्लेषकांच्या मते, भविष्यात हा सेगमेंट टेलीकॉम क्षेत्राच्या वाढीस चालना देऊ शकतो.
जेएम फायनान्शियलने म्हटले आहे की, फायबर आणि वायरलेस ब्रॉडबँड या दोन्ही क्षेत्रांत एकाचवेळी विस्तार करण्याची जिओची रणनीती स्पर्धकांच्या तुलनेत अधिक वेगाने पुढे जात आहे, ज्यामुळे कंपनीची बाजारातील स्थिती अधिक मजबूत राहू शकते.
विश्लेषकांच्या मते, मजबूत ग्राहकवाढ आणि ब्रॉडबँड विस्तारामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल व्यवसायाला गती मिळू शकते. ५जी आणि होम इंटरनेट सेवांमधील वाढता वाटा भविष्यात प्रति ग्राहक उत्पन्न आणि रोख प्रवाह सुधारू शकतो, ज्याला गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत मानले जात आहे.
—————————— ————————-

——————————