Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंदच्या पल्लवी पाटीलची कृषी उपसंचालकपदी निवड

विवेकानंदच्या पल्लवी पाटीलची कृषी उपसंचालकपदी निवड

कोल्हापूर :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या राजपत्रित वर्ग १ च्या पदांमधील भरतीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागात विवेकानंद कॉलेजची माजी विद्यार्थिनी पल्लवी संपतराव पाटील यांची कृषी उपसंचालक पदावर निवड झाली आहे. पल्लवी पाटील मुख्य परीक्षेत महाराष्ट्र राज्यात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
तिच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात विवेकानंद कॉलेजमधील इयत्ता अकरावी, बारावी सायन्समधील प्रवेशातून झाली. विवेकानंद कॉलेजमधून शिक्षण घेताना स्पर्धा आणि गुणवत्ता याचा समतोल राखण्याचा संस्कार आत्मसात करता आला आणि पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर लगेचच्या प्रयत्नांमध्ये हे यश मिळवता आले, असे मत सत्कारप्रसंगी  तिने मांडले.
पल्लवी पाटील यांचा विशेष सत्कार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सत्कारप्रसंगी ज्युनिअर सायन्स विभागप्रमुख प्रा. मुकुंद नवले, प्रा. सौ. गीतांजली साळुंखे, प्रा. सुदर्शन शिंदे, प्रा. किशोर गुजर, प्रा. डी. आर. पंडित, प्रा. संदीप पाटील व सायन्स विभागातील प्राध्यापक, पालक आणि कार्यालयीन वृंद उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
81 %
7.2kmh
100 %
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page