Homeशैक्षणिक - उद्योग मेहनत हाच यशाचा मार्ग : विनायक भोसले

मेहनत हाच यशाचा मार्ग : विनायक भोसले

• संजय घोडावत विद्यापीठात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात
कोल्हापूर :
यश मिळविण्यासाठी मोठे ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने आणि प्रामाणिकपणे मेहनत करणे आवश्यक आहे. जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट गाठता येते, असे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केले.
संजय घोडावत विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे आज उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
देशातील विविध राज्यांतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. नव्या विद्यार्थ्यांच्या आगमनाने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. देशभरातून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे विद्यापीठाविषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला विश्वास पुन्हा अधोरेखित झाला. यामध्ये इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, सायन्स, फार्मसी, कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, लॉ, डिझाईन तसेच विविध शाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
याप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील शिक्षणव्यवस्था, संशोधनासाठी उपलब्ध संधी, उद्योगाभिमुख शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील शैक्षणिक संधींचा लाभ घेत सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक सुविधा, विविध विद्यार्थी उपक्रम, करिअरच्या संधी आणि विद्यापीठाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
यावेळी विद्यापीठातील सर्व डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
29 ° C
29 °
29 °
79 %
2.6kmh
11 %
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page