कंदमुळांमध्ये शरीराला आवश्यक औषधी गुणधर्म : डॉ. बी. धीरज कुमार
कोल्हापूर :
मी बॉटनीचा विद्यार्थी आहे. तरीही कंदमुळांची इतकी माहिती मला नव्हती. दैनंदिन जीवनामध्ये कंदमुळांचा वापर केला पाहिजे. कारण बॉटनीचे शिक्षण घेताना शरीराला स्टार्च आणि फायबरची आवश्यकता असते. हे शिकलो होतो. ही गुणकारी पोषकद्रव्ये कंदमुळामध्ये असतात. याची फारशी माहिती कोणाला नाही. आपल्याला कंदमुळांचा विसर पडलेला आहे. पण कोल्हापुरातील या २५० हून अधिक महत्त्वपूर्ण कंदमुळांच्या प्रदर्शनामुळे पुढच्या पिढीला याची माहिती होईल. कंदमुळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. जे आपल्या शरीराला आणि आरोग्याला आवश्यक असतात, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांनी केले. दोन दिवस चालणाऱ्या कंदमुळांच्या प्रदर्शन उदघाप्रसंगी ते बोलत होते.
भारताला खूप मोठा इतिहास आहे. यामध्ये लुप्त होत चाललेल्या प्राचीन कंदमुळांचा शोध लावून तब्बल २५० हून अधिक कंदमुळांचे प्रदर्शन कोल्हापुरात भरवले गेलेले आहे. कोल्हापूरवासियांना या कंदमुळाच्या महोत्सवाची पर्वणी बघायला मिळणार आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी उदघाटनप्रसंगी केले.
कंदमुळे प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष आहे. मोहन माने यांच्या प्रयत्नातून पाच राज्यांसह महाराष्ट्रातील २५० कंदमुळे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. आदिमानव काळापासून अगदी रामायण महाभारतातमध्ये देखील कंदमुळाचा उल्लेख आहे. या औषधी व पौष्टिक कंदमुळांची ओळख व्हावी, त्याची शेती व्हावी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्याचा शास्त्रीय अभ्यास व्हावा. यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात असल्याचे निसर्ग अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सांगितले.
“लेट्स गेट बॅक टु अवर रूट्स” ह्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, अबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन “एनजीओ कम्पॅशन २४”, कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी केले आहे.
कोल्हापूर शहरातील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक येथे आयोजित या प्रदर्शनात कणगा, काटे कणंग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, कडुकंद, आळसी, शेवळा, सुरण या वनस्पतींची कंदमुळे, हवाई बटाटे, कंदीका आणि कंदक तसेच अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद, त्याचबरोबर काळी हळद, आंबेहळद, रानहळद यासारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद तसेच अमेरिकन अळू, चिनी बटाटे इत्यादी विदेशी कंदमुळे अशाप्रकारच्या सुमारे २५० हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती, प्रजातींची मांडणी केली आहे.
——————————
Mumbai
clear sky
27.6
°
C
27.6
°
27.6
°
64 %
4.4kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
27
°
Wed
28
°

