Homeकला - क्रीडापाटाकडीलची अंतिम फेरीत धडक

पाटाकडीलची अंतिम फेरीत धडक

कोल्हापूर :
अखेरपर्यंत चुरशीने खेळला गेलेला सामना पूर्णवेळेत गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकरमध्ये पाटाकडील तालीम मंडळने दिलबहार तालीम मंडळवर ४ विरूध्द ३ गोलने मात करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पाटाकडीलचा गोलरक्षक अमर गवळीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. गुरुवारी पाटाकडील आणि दिलबहार यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला. पाटाकडीलच्या ओमकार मोरेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलक्षेत्रातून दिलबहारच्या माणिक पाटीलने बाहेर काढून गोलचे संधी फोल ठरवली. नबी खानने मारलेल्या फटक्यावर गोलरक्षक जयकुमार मेथेने चेंडू बाहेर काढून गोलचे संकट टाळले. ऋषिकेश मेथे-पाटील, अमीन खझीर, यशराज कांबळे, रोमारिओ, प्रथमेश हेरेकर यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या. दिलबहारच्या फेबिन गिब्सने डी बाहेरून मारलेल्या चेंडूला गोलरक्षक अमर गवळीने रोखून गोलची संधी फोल ठरवली. स्वयंम साळोखेने गोलची सोपी संधी दवडली. त्यांच्या थांगजालेन हाओकीप, प्रथम भोसले, माणिक पाटील, संकेत वेसणेकर यांनी केलेल्या चढाया अयशस्वी ठरल्या. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या. पण गोलची नोंद करण्यात कोणालाही यश आले नाही. पूर्वार्धाप्रमाणेच उत्तरार्धात गोलफलक कोराच राहिला. पूर्णवेळेत दोन्ही संघाकडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन झाले पण गोलची नोंद करण्यात अपयश आल्याने सामना बरोबरीत राहिला.
सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यामध्ये दिलबहारकडून फेबिन गिब्सने गोल केला. त्यानंतर प्रथम भोसलेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी हुकली. तर सनी सनगरचा फटका गोलरक्षक अमर गवळीने रोखला. थांगजालेन हाओकीपने अचूक गोल नोंदवला. पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकरने मारलेल्या फटक्यावर चेंडू बाहेर गेला. नंतर अरबाज पेंढारी, रोहित पवार, अक्षय पायमल, रोहित मंडलिक यांनी अचूक गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अशाप्रकारे पाटाकडीलने ४ विरूध्द ३ गोलफरकाने सामना जिंकून अंतिम फेरी गाठली.
——————————————————-
  आजचा सामना…
• शिवाजी – खंडोबा : दुपारी ४ वाजता

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29 ° C
29 °
28.9 °
74 %
3.6kmh
2 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page