Homeशैक्षणिक - उद्योग गोकुळ’मध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा

गोकुळ’मध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते सुरक्षा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा प्रतिज्ञा घेत सुरक्षित कार्यसंस्कृती जपण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची जाणीव दृढ करण्याचा दिवस आहे. सुरक्षा ही प्रत्येकाची सामुहिक जबाबदारी आहे. आपण नियमांचे पालन केले, आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर केला आणि सतर्क राहिलो तर अपघात टाळता येऊ शकतात. उद्योगाची प्रगती कामगारांच्या सुरक्षिततेवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने व शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे.
या दिनानिमित्त सायबर महाविद्यालय कोल्हापूर येथील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थांनी सुरक्षिततेवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्यातून कामाच्या ठिकाणी उद्भवू शकणारे धोके, आवश्यक खबरदारी, तसेच सुरक्षा साधनांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी “मी सुरक्षा नियमांचे पालन करेन आणि इतरांनाही सुरक्षिततेबाबत जागरूक करेन” अशी शपथ घेत राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा संदेश दृढ केला.
कार्यक्रमास संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, रमेश पाटील, प्रताप पडवळ, बाजीराव राणे, शाहीर सदाशिव निकम, अमोल गडकरी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, सुरक्षा अधिकारी के. एस. कदम तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page