• डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यश
कोल्हापूर :
तोंडातील बुरशीजन्य संसर्गावर (ओरल थ्रश/कॅन्डिडिआसिस) मात करण्यासाठी अँटीफंगल ओरल जेल विकसित करण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळवले आहे. या ओरल जेलमध्ये २-डिऑक्सी ग्लुकोजचा वापर करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लेनरी स्टडीजमधील स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन व मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अश्विनी काळे आणि संशोधक विद्यार्थिनी डॉ. तंजिला कोटलगी यांनी अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले.
या ओरल जेलमध्ये २-डिऑक्सी ग्लुकोज या औषधाचा वापर करण्यात आला असून, ते तोंडातील फंगल संसर्गावर प्रभावी ठरणार आहे. औषधांच्या उच्च मात्रांमुळे अनेकदा साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागणाऱ्या एचआयव्ही रुग्णांसाठी हे जेल विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. या जेलमुळे तोंडातील बुरशीजन्य संसर्गाच्या उपचारात बदल अपेक्षित आहेत. औषधांची आवश्यकता आणि उपचाराचा कालावधी कमी होईल, अशी माहिती डॉ. अश्विनी काळे यानी दिली.
हे संशोधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ज्युनियर रिसर्च फेलोशिप योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे, संशोधन संचालक प्रा. पी. एस. पाटील आणि प्रा. डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांनी संशोधकांचे अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.
तोंडातील बुरशीजन्य संसर्ग रोखणारे जेल विकसित
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
6 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

