Homeशैक्षणिक - उद्योग 'गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये व गाय दूध खरेदी दरात...

‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये व गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ

• दूध उत्पादकांना महिन्याला साडेसात कोटी रुपये अधिक मिळणार : नविद मुश्रीफ
कोल्हापूर :
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व्हावा, म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये व गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ केली आहे.
दि. २१ फेब्रुवारीपासून म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ५२.५० वरून रूपये ५३.५० करण्यात आला आहे. तर गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर दर ३४.०० रूपये वरून ३६.०० रूपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे सात ते साडेसात कोटी रुपयाचा जादाचा दर मिळणार आहे. तसेच गोकुळच्या म्हैस दूध विक्री दरात २ रुपयाची वाढ करण्यात आली असून गाय दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही दरवाढ केलेली नाही.
गोकुळ संलग्न ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळ-जवळ १७ लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते. गोकुळचे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी गोकुळ नेहमीच कार्यरत राहिला आहे. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे सांगितले. दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजीच्‍या संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्ये सद्य बाजार स्थितीचा विचार करून निर्णय घेण्‍यात आला आहे. तसेच लवकरच संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना सुधारित दरपत्रक पाठवणेत येणार आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
0 %
Tue
29 °
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

You cannot copy content of this page