Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

विवेकानंद कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक व संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली.   याप्रसंगी डॉ. एस. पी.थोरात यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत इतिहास विभाग प्रमुख डॉ. एस. आर. कट्टीमणी यांनी केले. तसेच पन्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवक व एनसीसी विभागातील छात्र तसेच प्रा. कॅप्टन सुनिता भोसले व प्रा. डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.
यावेळी इतिहास विभागातील प्रा. डॉ. अनिल जांभळे यांनी छत्रपती शिवरायांविषयी आपले विचार व्यक्त केले. प्रा. डॉ. अश्विनी खवळे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. यावेळी ज्युनिअर, सिनिअर कॉलेज प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी, महाविद्यालयाचे प्रबंधक एस. के. धनवडे, व विद्यार्थी-विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29 ° C
29 °
28.9 °
74 %
3.6kmh
2 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page