Homeशैक्षणिक - उद्योग जीवाणू संसर्ग ओळखणारे पोर्टेबल इलेक्ट्रोकेमिकल उपकरण विकसित

जीवाणू संसर्ग ओळखणारे पोर्टेबल इलेक्ट्रोकेमिकल उपकरण विकसित

• डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे संशोधन
कोल्हापूर :
जीवाणूजन्य संसर्गांचे निदान आता अधिक जलद, अचूक आणि कमी खर्चात करणारे अत्याधुनिक इलेक्ट्रोकॅमिकल पोर्टेबल तंत्र विकसित करण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना यश मिळाले आहे. त्यामुळे ‘क्लेब्सिएला निमोनिया’ सारख्या धोकादायक जीवाणूच्या डीएनएची जलद ओळख करणे शक्य झाले आहे.
हे संशोधन विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चमधील स्टेम सेल ॲण्ड रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या प्रा. डॉ. अर्पिता पांडे-तिवारी आणि संशोधक विद्यार्थिनी विशाखा पारखे यांनी अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले आहे.
सध्या जीवाणूजन्य संसर्गांचे निदान करण्यासाठी पीसीआरसारख्या तांत्रिक आणि खर्चिक पद्धतींचा वापर केला जातो. या प्रक्रियेस वेळ, विशेष उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असते. मात्र नव्या इलेक्ट्रोकॅमिकल तंत्रज्ञानामुळे कमी वेळेत, कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने निदान शक्य होणार आहे.
‘क्लेब्सिएला निमोनिया’ हा जीवाणू फुफ्फुस, मूत्रमार्ग आणि त्वचेच्या संसर्गांसाठी कारणीभूत ठरतो. अनेक प्रतिजैविकांवर त्याने प्रतिकारशक्ती विकसित केल्याने उपचार अधिक गुंतागुंतीचे बनले आहेत. त्यामुळे वेळेत व अचूक निदान करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
या संशोधनात सोन्याचे नॅनोपार्टिकल्स आणि रिड्यूस्ड ग्राफीन ऑक्साइड यांच्या संयुगाचा वापर करण्यात आला आहे. हे संयुग अत्यंत संवेदनशील असून डीएनएच्या उपस्थितीत विद्युत प्रवाहात होणारे सूक्ष्म बदल अचूकपणे नोंदवते. रुग्णाच्या रक्तातील (सीरम) डीएनएचे प्रमाण वाढल्यास उपकरणात तत्काळ प्रतिसाद मिळतो.
या अभिनव संशोधनाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे आणि संशोधन संचालक प्रा. पी. एस. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
26 %
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page