Homeइतरछत्रपती शिवाजी महाराज ज्ञान-गंगाचे शनिवारी उत्तरप्रदेशातील उपधान येथे भूमिपूजन

छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान-गंगाचे शनिवारी उत्तरप्रदेशातील उपधान येथे भूमिपूजन

कोल्हापूर :
आशा ज्योती ग्रामीण उडान फाऊंडेशनतर्फे उत्तरप्रदेशातील उपधान, कुसरना (जि. केराकत) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान-गंगा : ग्रंथालय, अकॅडमी व वस्त्रोद्योग कौशल्य विकास केंद्र’ उभारण्यात येणार आहे. दीड एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ११ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्यासह हे केंद्र साकारणार आहे. या केंद्राचा भूमिपूजन समारंभ शनिवारी (दि. २१) सकाळी साडेदहा वाजता खासदार श्री शाहू छत्रपती महाराज व खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक रवी प्रेमनाथ उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खासदार श्री शाहू छत्रपती महाराज उपस्थित होते.
रवी उपाध्याय म्हणाले की, या केंद्राच्या भूमिपूजनानंतर एक वर्षाच्या कालावधीत या केंद्राची मोफत लोकसेवा सुरू होणार आहे. टेक्स्टाईल उद्योगाचा वारसा असणाऱ्या उत्तरप्रदेशातील गरीब युवकांना रोजगार व करिअरसाठी आवश्यक असणारे शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा मजले (ता. हातकणंगले) येथील शिल्पकार साकारत आहेत. २०२९ पर्यंत या केंद्राचा विस्तार १०० एकरांच्या भारतातील पहिल्या स्कील डेव्हलपेंट युनिव्हर्सिटीत करण्यात येणार आहे.
या प्रकल्पातून युवकांना १८ प्रकारच्या अभ्यासक्रमासह स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व अकॅडमी, आधुनिक ग्रंथालय, वस्त्रोद्योगातील रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण तसेच स्वाभिमान, नितिमत्ता, धैर्य व राष्ट्रधर्माची शिकवण मिळणार असल्याचे रवी उपाध्याय यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page