Homeराजकियभाजपमध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा : ना. चंद्रकांतदादा...

भाजपमध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा : ना. चंद्रकांतदादा पाटील

• भाजपा नूतन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार
कोल्हापूर :
भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा, असे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचा सत्कार रविवारी भाजपा जिल्हा कार्यालयात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. भेटवस्तू देऊन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद गटनेतापदी तानाजी पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असल्याने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशी कामगिरी करा. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या ६ जागा किरकोळ मतांनी हातातून निसटल्या आहेत. याबद्दल कोणीही नाराज न होता, पूर्वीच्याच उमेदीने आणि जोमाने पक्ष कार्यात सक्रीय रहावे.  विजयी झालेल्या सर्व उमेदवारांची जबाबदारी आता अधिकच वाढली आहे. पक्षामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं कार्यरत रहावे. त्यातून जनतेची विकासकामे करावी.
जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक भाजप लढवणार आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी घोषीत केले.
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष माजी आम. सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, समरजीतसिंह घाटगे, इचलकरंजी उप-महापौर अनिल डाळ्या, अंबरिष घाटगे, भरमू आण्णा पाटील, सावकार मादनाईक, माधवराव घाटगे, राहुल चिकोडे, शिवाजी बुवा, मेजर भिकाजी जाधव, डॉ. आनंद गुरव, सुशीला पाटील, महेश चौगले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.5 ° C
28.5 °
28.5 °
79 %
7.9kmh
32 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page