Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या चार माजी विद्यार्थ्यांचे राज्य सेवा परीक्षेत...

डॉ. डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या चार माजी विद्यार्थ्यांचे राज्य सेवा परीक्षेत यश

कोल्हापूर :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२४मध्ये घेण्यात आलेल्या कृषी सेवा गट अ (राजपत्रित वर्ग-१) परीक्षेत तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या चार माजी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पल्लवी संपतराव पाटील, शिवचरण हरी संकपाळ, सुरज बाबासो गायकवाड व नेहा दिलीप पाटील यांनी कृषी सेवा परीक्षा (गट अ )उत्तीर्ण केली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये कृषी उपसंचालक व तालुका कृषी अधिकारी यासारख्या क्लास वन पदावर त्यांची नियुक्ती होणार आहे.
माजी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य शेलार म्हणाले की, महाविद्यालयातर्फे स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन आणि विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यामुळे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या सर्वांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
26 %
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page