Homeसामाजिकविवेक सिद्ध यांना जीवनप्रकाश समाज गौरव पुरस्कार प्रदान

विवेक सिद्ध यांना जीवनप्रकाश समाज गौरव पुरस्कार प्रदान

कोल्हापूर :
जीवनप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘जीवनप्रकाश राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्काराने’ विवेक सिद्ध यांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक स्तरावर त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला.
जीवनप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व जीवनप्रकाश पब्लिक स्कुल व पॅरामेडिकल कॉलेज यांच्यावतीने शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. समाजातील शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, क्रीडा, साहित्य, व्यवस्थापन आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा आढावा घेवून हा सन्मान यावेळी करण्यात आला. महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यामध्ये सहभाग होता. यावेळी आयोजक मंडळातर्फे डॉ. प्रकाश दीपंकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यासाठी राजेंद्र पाटील – यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, डॉ. प्रा. शशिकांत कुलकर्णी, विशाल म्हतुगडे, डॉ. अभिता दीपंकर, चंद्रकला हलसवडेकर यांच्यसह संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
16 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page