Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या १६ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या १६ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथील एमबीए विभागातील १६ विद्यार्थ्यांची नुकत्याच झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली.
महाविद्यालयाच्या ऐश्वर्या रणदिवे, आसिफ बागवान, रितेश इनामदार, साक्षी भोसले, सुमित सिंग, स्वप्निल फुटाणे व तनिष्का भोपले या विद्यार्थ्यांची ‘व्ही-एक्सप्रेस’ या कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ४.०८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. तसेच सुमित सिंग याची ‘कोडयंग’ या कंपनीत ५.३६ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह निवड झाली. प्रेरणा घराळे, प्रज्वल कोरे, इकरा सनदी, ईशा कुंभार, दिव्या निकम, ऋषिकेश गायकवाड, मेघा सदलगे व सायली पाटील यांची ‘डी-मार्ट’साठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्याचा टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतिश पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्लेसमेंट अधिकारी प्रा. शोएब तांबोळी, एमबीए विभागप्रमुख प्रा. गुणाली दिवाण, प्रा. चैतन्य शहा यांच्यासह  प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती  ऋतुराज पाटील व विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page